About
Diet Plans

Healthy Diet & Nutrition
Articles & Videos
by Ms. Sayali

 English & Marathi Articles
written by Ms. Sayali
(Click to read the article)

Ayurvedic Nutritional Practices
- A sustainable Weight Management Technique


Ayurvedic nutrition is a holistic approach to healthy eating that is rooted in the principles of Ayurveda, an ancient system of medicine that originated in India. According to Ayurveda, food is not just fuel for the body, but a source of nourishment for the mind, body, and spirit. Ayurvedic nutrition emphasizes the importance of eating a balanced diet that is tailored to your individual needs and promotes optimal health and well-being.

When it comes to weight loss, Ayurvedic nutrition takes a unique approach that focuses on balancing the body's doshas, or energies. According to Ayurveda, imbalances in the doshas can lead to weight gain and other health problems. By addressing these imbalances through nutrition, you can help to promote weight loss and improve overall health.

Here are some Ayurvedic nutrition practices that can help with weight loss:

By incorporating these Ayurvedic nutrition practices into your life, you can help to balance your doshas, improve digestion, and promote weight loss. Ayurvedic nutrition is a holistic approach that focuses on nourishing the mind, body, and spirit, and can lead to long-term health and wellness. So why not give Ayurvedic nutrition a try and see the transformative effects for yourself?

As an Ayurvedic and modern nutritionist, I strongly believe in a holistic approach to weight loss or effective fat loss. My diet plans incorporate principles of Ayurvedic nutrition, such as eating fresh, seasonal, and local foods, and combining foods in a way that supports optimal digestion. At the same time, I also incorporate modern nutritional science, such as understanding the role of macronutrients and portion control in achieving weight loss goals. This blended approach has helped many of my clients achieve sustainable and long-lasting results in their journey towards a healthy weight and overall well-being.

Ms. Sayali,
Certified Face Yoga Specialist
Certified Nutritionist,
Pune.
www.faceyogawithsayali.com

The Dark Side of Fast Weight Loss 


In today's fast-paced world, many people are looking for quick and easy ways to lose weight. From fad diets to extreme workout programs, there is no shortage of weight loss programs promising to deliver fast results. However, the dangers of these programs are often overlooked, as many people prioritize quick results over their overall health and well-being.

Fast weight loss programs can be dangerous for a number of reasons. First and foremost, they often involve restrictive diets that can lead to nutrient deficiencies and other health problems. For example, a diet that is very low in calories or eliminates entire food groups can cause the body to go into starvation mode, slowing down the metabolism and making it harder to lose weight in the long term.

Furthermore, fast weight loss programs often focus on losing weight quickly, rather than promoting overall health and well-being. This can lead to the loss of muscle mass, which can in turn slow down the metabolism and make it harder to maintain weight loss over time. In addition, fast weight loss can also lead to loose skin, stretch marks, and other beauty concerns.

Ultimately, the dangers of fast weight loss programs far outweigh any potential benefits. Sustainable weight loss requires a balanced approach that prioritizes overall health and well-being. This includes eating a healthy and balanced diet, engaging in regular exercise, and making lifestyle changes that support long-term weight management. By taking a more holistic approach to weight loss, you can achieve lasting results that will not only benefit your physical appearance but also your overall health and well-being.

Incorporating Ayurvedic principles into a weight loss program can be an effective way to achieve steady, sustainable weight loss. Ayurveda emphasizes the importance of balance in all aspects of life, including diet and exercise. By understanding your unique constitution or dosha, an Ayurvedic practitioner can create a personalized weight loss plan that is tailored to your specific needs and goals.

An Ayurvedic approach to weight loss involves making gradual changes to your diet and lifestyle, rather than relying on drastic or restrictive measures. This can include incorporating more whole foods into your diet, practicing mindful eating, and engaging in regular exercise that is appropriate for your body type and level of fitness.

In addition, Ayurveda recognizes that weight gain can be caused by a variety of factors, including stress, poor digestion, and hormonal imbalances. By addressing these underlying issues, an Ayurvedic approach to weight loss can promote overall health and well-being, while also supporting sustainable weight loss.

Ultimately, the key to achieving steady weight loss with an Ayurvedic approach is to prioritize balance and moderation, rather than relying on extreme or unsustainable measures. By working with an Ayurvedic practitioner and taking a holistic approach to weight loss, you can achieve lasting results that support your overall health and well-being.

As an Ayurvedic and modern nutritionist, I strongly believe in a holistic approach to weight loss or effective fat loss. My diet plans incorporate principles of Ayurvedic nutrition, such as eating fresh, seasonal, and local foods, and combining foods in a way that supports optimal digestion. At the same time, I also incorporate modern nutritional science, such as understanding the role of macronutrients and portion control in achieving weight loss goals. This blended approach has helped many of my clients achieve sustainable and long-lasting results in their journey towards a healthy weight and overall well-being.

 
Ms. Sayali,
Certified Face Yoga Specialist
Certified Nutritionist,
Pune.
www.faceyogawithsayali.com

असेल माझा हरि ! तर देईल खाटल्यावरी !! (Marathi)

असेल माझा हरि ! तर देईल खाटल्यावरी !! 

गेल्या महिन्यात माझ्या व्यवसायानिमित्त एका मीटिंगला जाण्याचा योग आला. मीटिंग सकाळी होती ८ वाजता आणि मीटिंग नंतर न्याहारीची व्यवस्था केली होती. मीटिंग मध्ये मी न्यूट्रिशन आणि फेस योगाबद्दल एक छोटं प्रेझेंटेशन दिलं. खूप आवडलं सगळ्यांना !  बरेच प्रश्न, चर्चा इत्यादि झाल्यानंतर आम्ही सर्व जण न्याहारीसाठी दुसर्‍या हॉल मध्ये आलो.

पोहे, मेदू वडा, चटणी, भजी, साबुदाणा वडा, दही, मोड आलेले मूग, ब्रेड-बटर-जॅम, कलिंगड, सफरचंद, लिंबू सरबत, चहा, कॉफी !!  - असा छोटासाच मेनू  एका लांबलचक टेबलावर मांडून ठेवला होता ! मी माझी प्लेट बनवली – २ मेदू वडे, थोडी चटणी आणि कालिंगडाच्या २ फोडी !! ब्रेकफास्ट घेतही गप्पा रंगलेल्याच होत्या. न्यूट्रिशन आणि फेस योगाबद्दल जाणण्यास उत्सुक असे सात आठ जण माझ्यासोबत बसले होते. येणारा-जाणारा प्रत्येक जण माझ्या प्लेट कडे पाहून कमेंट करत होता – “ का हो ? एवढंच ?? अच्छाऽऽऽ... !!! तुम्ही डायट वाल्या नाही का ! तुमची प्लेट अशीच असणार !! ” मी आपली बळंबळं हसून वेळ मारून नेत होते.

तेवढ्यात एक ताई त्यांची प्लेट सांभाळत सांभाळत, कशीबशी एक खुर्ची घेऊन माझ्यापाशी येऊन बसल्या. माझ्याहून वयाने थोड्या मोठ्या असतील – पन्नाशीच्या वगैरे ! शेजारी बसल्या बसल्या, आमच्या चालू असलेल्या चर्चेला आडकाठी घालून, एकदम खणखणीत आवाजात ताईंचा पहिला प्रश्न – “अहो माझं वजनच कमी होत नाहीये ! काही जालिम उपाय सांगाल का ?” तेवढ्यात माझी नजर त्यांच्या प्लेट कडे गेली. ५-६ मेदू वडे, २ साबुदाणा वडे, पोहे, २-३ भजी, चटणी, ब्रेड-जॅम, कलिंगड...... एखादाच पदार्थ घ्यायचा राहिला होता ! कदाचित जागा संपली प्लेट मधली…. म्हणूनही असेल !!

माझं ऑब्झरवेशन चालू असतानाच, मेदू वड्याचा एक तुकडा चटणीत बुडवून तोंडात सरकवत, भरल्या तोंडाने ताईंचा पुन्हा प्रश्न – “काही केल्या कमी होत नाहीये हो ! इतके डाएटीशियन ट्राय केले. सगळे बिनकामी !! मला तुमचं प्रेझेंटेशन खूप आवडलंय - मॉडर्न आणि आयुर्वेदिक न्यूट्रीशन चा ब्लेण्ड ! वाह !! तुमचा डायट प्लॅन घेईन मी नक्की !!”  मी बळंबळं खुश झाल्यासारखा चेहरा केला खरा... पण सोबत आवंढा गिळला आणि मनात थोडी चरकलेच !! झालं ! ताई आता माझं पण नाव खराब करणार.... !!  एक बिनकामी न्यूट्रीशनिस्ट म्हणून !!! – अशी थोडी भीतीच वाटली !! कारण देव जरी प्रकट झाला न्यूट्रीशनिस्ट म्हणून, तरी आपण जर त्याचं ऐकलच नाही, स्वतःवर किमान थोडसं नियंत्रण ठेवलंच नाही, तर मग कुठलाच उपाय कामी येणार नाही. सगळं बिनकामीच ठरणार !!!

चमत्कारिक रिझल्टस् सगळ्यांनाच हवे आहेत, पण मेहनत घ्यायला खूप कमी जण तयार आहेत. ही दुर्दैवी वस्तुस्थिती ! आणि आता हीच मानसिकता टॅप केली जात आहे आणि खूप सार्‍या जाहिरातींना ऊत आला आहे. “काहीही व्यायाम न करता १० किलो वजन कमी करा, फक्त २१ दिवसात !!”  "वजन कमी करणारी पावडर, गोळ्या" “किटो डायट, व्हीगन डायट, हा डायट, तो डायट !!” – भारी वाटतं ना ऐकायला ??? मला ह्या असल्या जाहिरातींच्या वास्तविकतेवर इथे काही चर्चा करायची नाहीये ! पण लोकांच्या मानसिकतेवर चर्चा नक्कीच करायची आहे. आजकाल सगळ्यांना स्वतःचे आरोग्य, फिटनेस, सौंदर्य हे एकदम बेस्ट पाहिजे आहे.  पण... एकदम झटपट आणि कोणत्याही संयमाशिवाय !!

असंच घडतं माझ्या फेस योगाच्या काही क्लाएंट्स् च्या बाबतीतही ! माझ्या फेस योगाच्या वर्कशॉप मध्ये अत्यंत चमत्कारिक रिझल्ट्स् दिसले की एकदम खुश होतात, भारावून जातात की - “अरेच्चा !! मी सुद्धा नॅचरली एवढी नितळ, उजळ आणि सुंदर दिसू शकते !” पण नैसर्गिकरीत्या सौन्दर्य खुलविण्यासाठी नियमितपणे रोज फक्त १५-२० मिनिटे फेस योगाचा सराव करा म्हटलं, की गाडी थंड !! शरीर बाहेरून सजविण्यासाठी कपडे, कॉस्मेटिक्स, दागिने हे सगळं खरेदी करण्यासाठी तासन्-तास बाजारात हुंदडतील.  ३-३ तास पार्लर मध्ये, स्पा मध्ये जाऊन बसतील...  (माझा ह्यासाठी विरोध नक्कीच नाहीये ! ज्याचा त्याचा चॉइस !!) पण नियमाने काही सोप्या गोष्टी करा म्हटलं की चेहरा लगेच पडतो आणि भरपूर कारणं गळ्यापर्यंत येऊन तयार असतात....

मान्य आहे की प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, वेगवेगळ्या एंगेजमेंट्स् आहेत, समस्या आहेत... पण तरीही आपल्याकडे स्वतःसाठी. स्वतःच्या आरोग्यासाठी, फिटनेस-साठी, सौन्दर्य खुलविण्यासाठी थोडा वेळ नक्कीच आहे.  जर तो योग्य पद्धतीने वापरण्यास शिकलो, तर नक्कीच चमत्कार घडू शकतात आणि अनेक चमत्कार घडलेले मी पाहिले आहेत, अनुभवले आहेत.

असो !! ताईंनी प्लेट मधील सगळे मेदू वडे, साबुदाणा वडे, भजी, पोहे, कलिंगड, ब्रेड – सगळं गट्टम केलं... ग्लास-भर पाणी प्यायल्या...  अतिशय उत्साहाने माझा फोन नंबर घेतला आणि मिष्किलपणे हसत-हसत “बाय बाय”  करून निघून गेल्या !! मी मात्र त्यानंतर २-३ आठवडे फोन वाजला की भीत-भीतच स्क्रीन पहायचे.  आणि अन्-सेव्हड् नंबर असला की अजून धडधड वाढायची ! ताईंचा फोन तर नसेल ना ?? अजून पर्यंत तरी आलेला नाहीये !  लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.  ताईंपर्यंत हा लेख पोचला पाहिजे !!

मिस् सायली,
सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट
सर्टिफाईड फेस योग शिक्षिका
पुणे.
www.faceyogawithsayali.com


“उड्या न मारताच” आम्हाला द्राक्षे आंबट ! (Marathi)

( कोल्हयाने बिचार्याने उड्या तरी मारल्या )
“उड्या न मारताच” आम्हाला द्राक्षे आंबट ! 

बालपणी एकत्र खेळणार्‍या, शाळा सुटल्यावर चिंचा, बर्फ-गोळा, पेरू खात-खात गप्पा मारत घरी येणार्‍या आम्ही दोघीही आता २-२ मोठ्या मुलामुलींच्या आया झालो होतो !!! विश्वासच बसत नव्हता की आम्ही दोघी २५ वर्षांनी परत तिथेच, शाळेच्या बाहेरील त्याच कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो, रविवारच्या एका शांत संध्याकाळी !!!

पोट भयानक सुटलेलं, चेहरा बेढब आणि काहीसा डागाळलेला, स्कीन खूप रफ झालेली,वजन नक्कीच ३ आकडे पार करून बरच पुढे गेलेलं !!! बालपणी शाळेत आमच्या वर्गातील “ब्युटी-क्वीन” असणार्‍या अनुजाचं असं विचित्र रूप पाहून माझ्या मनात एकदम धस्स झालं !!  तब्बल २५ वर्षांनी भेटत होतो आम्ही ! बराच काळ लोटला होता !! आयुष्य बदलून गेलं होतं !!!

खूप भारावलो होतो आम्ही दोघी.... अनुजा ! माझी जीवलग बालमैत्रीण !! पण काळाच्या ओघात ताटातूट झाली. तिची फॅमिली सुरतला शिफ्ट झाली १० वी नंतर. तेव्हा ना व्हाट्सअॅप होते ना फेसबुक ! साधा लॅंडलाइन फोनही नव्हता आमच्या घरी… एकमेकींना पत्रे लिहिली आम्ही थोडे दिवस. पण नंतर जीवन व्यस्त होत गेलं.  आता अनुजा परत पुण्यात शिफ्ट झाली होती.

एका नामांकित कंपनी मध्ये खूप मोठ्या हुद्दयावर जाऊन पोचली होती अनुजा ! तशी लहान पणापासून होतीच हुशार. पण मेहनतही खूप घेतली आहे, हे कळत होतं. पण करीअर च्या मागे धावण्यात स्वतःच्या तब्येतीची भयानक हेळसांड झालेली सुद्धा स्पष्ट दिसत होती. खरच खूप शॉकिंग होता तिचा २५ वर्षांनंतरचा लुक !!  माझी खूप इच्छा झाली की अनुजाशी बोलावं तिच्या तब्येतीबाबत, वजनाबाबत, एकूणच आरोग्याबाबत ! एवढं स्वतःकडे दुर्लक्ष चांगलं नाहीये.... वगैरे वगैरे !! पण नाही झालं माझं धाडस ! पाहिल्याच भेटीत कसं विचारु ??? २५ वर्षांनी भेटत होतो ना !!

पण एका आठवड्यानंतर तिनेच स्वतःहून काढला विषय. कारण मी न्यूट्रिशनिस्ट आहे आणि फेस योगाचे क्लास घेते हे तिला कळलं होतं तोपर्यंत ! मग मात्र मी खूप स्पष्ट बोलले... एकदम सडेतोड... साहजिकच प्रेमापोटी, काळजीपोटी !! अनुजाला सगळं कळत होतं की कशी ती स्वतःकडे दुर्लक्षच करत आली इतकी वर्ष. तिचा नवरा, बहीण, आई सगळे तिच्या मागे लागले होते – की दे लक्ष स्वतःकडे. काढ थोडा वेळ. पण अनुजाचं जीवन खूपच व्यस्त !!! मोठा मुलगा दहावीत, मुलगी शाळेत, तिचा स्वतःचा कामाचा व्याप, आठवड्यातून किती तरी वेळा बाहेरचं जेवण, काहीही व्यायाम नाही,झोपायच्या नियमित वेळा नाहीत, कामानिमित्त खूप सारा प्रवास, खूप स्ट्रेस... समाजाच्या दृष्टीने “खूप यशस्वी कॉर्पोरेट लाइफ” पण “पर्सनल लाइफ” खूपच अस्ताव्यस्त, भरकटलेलं ! त्यात नुकताच चालू झालेला थायरॉइड चा त्रास ! खूप वाईट वाटलं मला सगळं पाहून, ऐकून !! करतीये अनुजा थोडा प्रयत्न आता – “स्वतःकडे” लक्ष देण्याचा !!

अश्या खूप सार्‍या “अनुजा” पाहते मी अवती-भोवती ! काही ना काही कारणामुळे स्वतःकडे झालेलं प्रचंड दुर्लक्ष !!! काही परिस्थितीमध्ये गुरफटलेल्या !! काही हतबल !! काही गोंधळलेल्या !! पण बर्‍याच जणी “आळशी” सुद्धा बरंका !! आणि काही “आगाऊ” सुद्धा !! एक पन्नाशीच्या जवळ असणारी “आगाऊ” बाई तर एकदा मला म्हणाली, “काय कारायचंय आता सुंदर दिसून ? झालं की सगळं ! लग्न झालं, मुलं मोठी झाली !! आता कोणाला दाखवायचं आहे सौंदर्य ??” – खूप काय काय बोलली अजून !!!  अश्या बोलण्यात जरी एकदम “वैराग्य” ओतप्रोत भरल्यासारखं भासत असलं, तरी थोडं खोलात गेलं की कळतं, की हे “वैराग्य” नसून “वैताग” आहे, “आळस” आहे, “निष्काळजीपणा” आहे, “निराशा” आहे, “वैफल्य” आहे !!! प्रश्न फक्त सौंदर्याचा नाहीये. प्रश्न आरोग्याचा आहे, टापटिपीचा आहे, आत्मविश्वासाचा आहे,पद्धतशीर जीवन जगण्याचा आहे !!

काही जणी हतबल आहेत. कळत नाहीये बाहेर कसं पडायचं ते !! पण बर्‍याच जणी असंही भासवताना दिसतात की "तब्येतीकडे, वजनाकडे, त्वचेकडे,सौंदर्‍याकडे लक्ष देण्याची आम्हाला काही गरजच नाहीये." कारण एकतर “हे सगळं इतकं महत्त्वाचंच नाहीये” किंवा “आम्हाला ते जमणारच नाहीये” !!  हे म्हणजे त्या बिचार्‍या “आंबट द्राक्षे वाल्या” कोल्हयापेक्षा दुर्दैवी लक्षण आहे !! त्या कोल्हयाने उड्या तरी मारून पाहिल्या !! प्रयत्न तरी केले !! पण आम्ही “उड्या न मारताच” जगाला सांगतोय, की “द्राक्षे आंबटच आहेत !!” किंवा “आम्हाला द्राक्षे नकोच आहेत !! काय गरज आहे द्राक्षांची ???”  ही खरंच गांभीर्याने विचार करण्याजोगी महत्त्वाची समस्या आहे आपल्या प्रत्येकीच्या जीवनातली !!

मिस् सायली,
फेस योग शिक्षिका आणि न्यूट्रिशनिस्ट
पुणे.
www.faceyogawithsayali.com


वजन कमी करताना...

वजन कमी करताना...

प्रतिक्षा आणि मी जवळपास ३-४ महिन्यांनंतर भेटत होतो. भेट तशी अचानकच झाली. एकदम अनपेक्षित ! आणि तिला पाहताक्षणी मी आ-वासून निःस्तब्ध उभी ! कारण सुद्धा तसंच होतं ! कमीत कमी २० किलो कमी वजन कमी केलं होतं पठ्ठीने !! ३ महिन्यांपूर्वीची जाडजूड प्रतिक्षा आता एकदम स्लिम-ट्रिम !! नवीन कपडे जीन्स-टॉप ! एकदम चकाचक !! एवढ्या भरघोस यशाबद्दल अभिनंदन केलंच मी तिचं !

पण थोड्या गप्पा झाल्यावर माझं जरा व्यवस्थित लक्ष गेलं तिच्या चेहर्‍याकडे ! खूप भडक मेक-अप केलेला आधी पटकन लक्षात आला नव्हता ! पण नीट पाहिल्यावर समजलं की तिचा चेहरा खूप आकसला गेला होता, अत्यंत निस्तेज ! एवढा सारा मेक-अप चोपल्यावर कुठे थोडी बरा दिसत होता चेहरा !!

“२१ दिवसात ५ किलो वजन कमी करा ! दोन महिन्यात १५ किलो कमी करा !!” अश्या जाहिरातींना खूप ऊत आला आहे. इतक्या झटपट वजन कमी करणे तब्येतीसाठी खूप घातक ठरु शकते. झटपट वजन करण्याचे असंख्य दुष्परिणाम आपल्याला अनेक एक्स्पर्ट्स कडून इंटरनेट वर वाचायला मिळतीलच. जसे – डोकेदुखी, चिडचिड, थकवा, चक्कर येणे, बद्धकोष्ठता, मासिक पाळीत अनियमितता, केस गळणे, कुपोषण, चयापचाय बिघडणे, स्नायूंचे नुकसान, डिहायड्रेशन, मानसिक अस्वास्थ्य, हार्मोनल इमबॅलेंस इ.

पण त्यापैकी एक दुष्परिणाम जो चेहर्‍याशी आणि त्वचेशी संबंधित आहे – त्याची आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत.


त्यामुळे वजन कमी करताना इतरही अनेक गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्यदायी, बॅलेन्स्ड, ऑरगॅनिक आणि “स्लो-अँड-स्टेडी” वेट-लॉस (actual fat-loss) हा निरुपद्रवी सिद्ध होतो आणि त्यासोबत त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस योग, नैसर्गिक फेस-पॅक, स्कीन नरीशिंग-ज्युसेस ह्यांची खूप चांगली मदत होते. फॅट-लॉस आणि फेस-योग तसेच योग्य व्यायाम हयाद्वारे एक उत्तम बॅलेन्स ठेवत वजन कमी करणे अत्यंत लाभदायक ठरते. ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन सर्व साधारपणपणे महिन्याला २ ते ३ किलो वजन कमी होणे हे नैसर्गिक, निरुपद्रवी, सस्टेनेबल आणि एकंदर आरोग्यास पोषक ठरू शकते.

मिस् सायली,
सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट
सर्टिफाईड फेस योग शिक्षिका
पुणे.
www.faceyogawithsayali.com